प्रशांत चंदनखेडे वणी
सरपंचाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध नोंदवून महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना सरपंच संघटनेचे सर्वच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असतांनाच आज महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच गावचा सरपंच असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून करण्याइतपत हिंमती वाढलेल्या या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष प्रविण झाडे, सचिव गीता उपरे, कार्याध्यक्ष अनिल देऊळकर, उपाध्यक्ष नागेश धनकसार, संतोष काकडे, विद्या पेरकावार, कल्पना टोंगे, सरचिटणीस पूजा बोढाले, स्वाती झाडे, गणेश टेकाम, ज्योती माथुलकर, सुवर्णा भोयर, सदस्य वर्षा राजूरकर, शीतल गौरकार, दीपमाला वडस्कर, वर्षा मडावी, बबन वाटेकर आदी उपस्थित होते.
![]() |
No comments: