प्रशांत चंदनखेडे वणी
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६८ व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील संत गाडगेबाबा चौक येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला किरण देरकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या विजय चोरडिया, दीपक कोकास, सुनिल कातकडे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर यांनी देखील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी नगर सेवा समितीच्या वतीने गरजवंतांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. याप्रसंगी गुरुसेवा मंडळाचे ठेंगणे, विजय चोरडिया, विजया दहेकर, सुनिल कातकडे, दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबा यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच किरण देरकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या समाज सुधारणेची महिती सांगतांना म्हटले की, संत गाडगेबाबा यांनी माणसात मानवता रुजविण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगतानाच शिक्षणाची कास धरण्याचा उपदेश अख्ख्या मानवजातीला दिला.
कार्यक्रमाला सरपंच गीता उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके, बेबी थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर, माधुरी फाले, राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे, भगवान मोहिते, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, श्याम बिहारी, स्वप्नील बिहारी, महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर, सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले, पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर, विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे, राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके आदी उपस्थित होते.
No comments: