अपघाताची मालिका सुरूच, दुचाकीला झालेल्या भीषण अपघात पत्नीचा मृत्यू तर पती अत्यवस्थ

प्रशांत चंदनखेडे वणी 

दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज २२ डिसेंबरला सायंकाळी ६ ते ६.१५ वाजताच्या सुमारास वणी-वनोजा मार्गावर घडली. दुचाकीला कारने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक हा कारसह घटनास्थळावरून पसार झाल्याचे बोलल्या जात आहे. शुभांगी पुंडलिक वऱ्हाटे वय अंदाजे ४८ वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर महिलेचा पती पुंडलिक वऱ्हाटे वय अंदाजे ५५ वर्षे हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावातील रहिवाशी असलेलं हे दाम्पत्य कार्यक्रमासाठी वणी तालुक्यातील लाखापूर येथे आलं होतं. लाखापूर येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने ते व त्यांचे स्नेहसंबंधी दुचाकीने कार्यक्रमालाआले होते. कार्यक्रम आटपून पती पत्नी हे दुचाकीने आपल्या स्वगावी परतत असतांना वणी व वनोजा दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन हे भरधाव वेगात घटनास्थळावरून पसार झाल्याचेही बोलल्या जात आहे. काळ्या रंगाचे थार नावाचे हे वाहन असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनेचा प्राथमिक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी