पत्रकार विवेक तोटेवार यांना पितृशोक
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील रामपुरा वार्ड येथील रहिवाशी असलेले भैय्याजी बापूराव तोटेवार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ७४ वर्षांचं होतं. वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांचे ते वडील होते. आज २८ डिसेंबरला सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांच्या राहत्या घरून आज त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. भैय्याजी तोटेवार हे अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. परिसरात ते सर्वांच्याच परिचयाचे होते. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
Comments
Post a Comment