वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले, महसूल विभाग व डीबी पथकाची वेगवेगळी कार्यवाही



प्रशांत चंदनखेडे वणी 

महसूल विभाग व डीबी पथकाने वाळू चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करून ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. डीबी पथकाने ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाची गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कार्यवाही २६ डिसेंबरला दुपारच्या सुमारास करण्यात आली.

मानकी-पेटुर मार्गावरील रेल्वे पुलापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने पेटुर नाल्यावर जाऊन पाहणी केली असता तेथे एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरतांना आढळून आले. नाल्यावरून रेती भरून हे ट्रॅक्टर निघत असतांनाच डीबी पथकाने या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. वाळू चोरी करणारे हे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे. दिवसाढवळ्या रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक निलेश शंकर मिलमिले (२८) रा. मानकी याच्यावर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टर हे विना क्रमांकाचे असून ट्रॉलीवर MH २९ R ८७३९ हा क्रमांक लिहिला आहे. ही कार्यवाही एपीआय धिरज गुन्हाने, जमादार संतोष आढाव, मो. वसीम, श्याम राठोड यांनी केली.

वाळू चोरीच्या दुसऱ्या ट्रॅक्टर वरील कार्यवाही ही महसूल विभागाने केली. घोन्सा मार्गावरून हे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर लावण्यात आले असून ट्रॅक्टर चालकावर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरचा क्रमांक MH २९ BP ९६५० हा असून ट्रॉलीचा क्रमांक MH २९ BV ८५३६ हा आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी