धूमस्टाईल बाइकस्वारांना आवरा अन्यथा रस्त्यावर उतरू, रवि बेलुरकर यांचा इशारा

प्रशांत चंदनखेडे वणी 

पोलिस प्रशासनाला वरकमाईची जास्तच चटक लागल्याने त्यांचं प्रामाणिक कर्तव्य बजाविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या असून गुन्हेगारी प्रवृत्तीपुढे पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीत होत असलेली वाढ बघता गुन्हेगारांवर पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. शहरात दादा भाईंचं प्रचंड पिक येऊ लागलं आहे. जो तो स्वतःला भाई समजू लागला आहे. शहरात भाईगिरीला अक्षरशः उधाण आलं आहे. टवाळखोर व टपोरी तरुणांनी शहरात उच्छाद मांडला आहे. टपोरी तरुणांचे टोळके शहरात हौदोस घालतांना दिसत आहेत. आता या गल्ली दादांच्या हिंमती प्रचंड वाढल्या आहेत. कुणालाही विनाकारण शिवीगाळ करणे, धमकाविणे, मारहाण करणे हे या टपोरी तरुणांचं नेहमीचंच झालं आहे. टपोरी तरुणांच्या गुंडगिरीमुळे सामान्य जनता वेठीस आली आहे. महिला, मुली व विद्यार्थिनींची छेड काढणे, चिडीमारी करणे, तरुण मुली व विद्यार्थिनींचा पिच्छा पुरविणे हे या टपोरी तरुणांचा दिनक्रम झाला आहे. शाळा, कॉलेज व शिकवणी वर्ग असलेल्या ठिकाणी या टपोरी तरुणांचे घोळके घुटमळत असतात. शाळा, कॉलेज व शिकवणी वर्गांमधून विद्यार्थिनी बाहेर पडताच या टपोरी तरुणांची धूमस्टाईल बाईक चालविण्याची स्पर्धा सुरु होते. या टपोरी तरुणांच्या धूमस्टाईल बाईक चालविण्याने कित्येक छोटे मोठे अपघात घडले असून अपघातात अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले आहेत. शहरात चिडीमारी व धूमस्टाईल बाईक चालविणाऱ्या टपोरी तरुणांना पोलिस व कायद्याचा जराही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिडीमारी, टपोरीगिरी व धूमस्टाईल बाईक चालविणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही न केल्यास श्रीराम नवमी समिती पोलिस प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. धूमस्टाईल बाइकस्वारांनी शहरात प्रचंड कहर केला आहे. यात अल्पवयीन तरुणही मागे नाहीत. नियमबाह्य पद्धतीने सुसाट मोटारसायकल चालविल्या जात आहेत. शाळा, कॉलेज व शिकवणी वर्ग असलेल्या रस्त्यांवर तर बाइकस्वारांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. सुसाट बाइक चालविण्याची एकप्रकारे तरुणांमध्ये स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळते. बहुतांश तरुणांजवळ रेसर बाईक आहेत. त्यामुळे धूमस्टाईल बाईक चालवून ते हिरोपंती दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पाहून इतर तरुणही आपल्या मोटारसायकलचे एक्सलेटर फुल वाढवितात. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरून धूम मोटारसायकल चालविणाऱ्या या तरुणांमुळे सावध वाहने चालविणारे नागरिक प्रचंड धास्तीत आले आहेत. धूमस्टाईल बाइकस्वारांमुळे पादचारीही भयभीत झाले आहेत. या धूमस्टाईल बाइकस्वारांनी शहरात हौदोस घातला आहे. तरुणांच्या बेधुंद बाईक चालविण्यामुळे रस्त्याने जाणे येणे करणारे नागरिक भीतीच्या सावटात आले आहेत. तरुणांच्या भरधाव व निष्काळजीपणे मोटारसायकल चालविण्याने कित्येक छोटे मोठे अपघात घडले आहेत. अपघातात कित्येक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलं आहे. 

शहरातील वाहतूक ही पूर्णतः बेशिस्त झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचा वाहतूक पोलिसांकडून प्रामाणिक प्रयत्न होतांना दिसत नाही. वरकमाईकडे त्यांचं जास्त लक्ष असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. ऑटोचालकही बेशिस्त झाले असून त्यांचीही रस्त्यांवर सर्कस पाहायला मिळते. ऑटो चालकांचे शहरात ठिकठिकाणी अनधिकृत ऑटो स्टॅन्ड तयार झाले आहेत. ऑटो चालकांची शहरात प्रचंड मनमानी वाढली आहे. ऑटो चालक रस्त्यावर कुठेही ऑटो उभे करतात, रस्त्यावरून सुसाट ऑटो वळवितात, इंडिकेटर किंवा कुठलेही संकेत न देता वळण घेतात. खाती चौक ते गांधी चौक, टिळक चौक ते हमीद चौक, टिळक चौक ते दीपक चौपाटी तसेच टिळक चौक ते बस स्टँड या वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी ऑटो थांबवून रहदारीला अडथळे निर्माण केले जात असतांनाही वाहतूक पोलिस ऑटोवर कार्यवाही करतांना दिसत नाही. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला वाहतूक पोलिसांनी शिस्त न लावल्यास श्रीराम नवमी समिती आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्रीराम नवमी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी