क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गणेशपूर येथे विविध कार्यक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती व छत्रपती महोत्सव समितीच्या विद्यमाने गणेशपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत समोरील पटांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता छत्रपती स्मारक येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गुणवंत पचारे हे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारणार आहेत. ढोलताशाच्या गजरात प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नूरजहॉ बेगम चॅरीटीबल ट्रस्ट वणीच्या सचिव डॉ. राणा नुर सिद्दीकी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम बहुउद्देशीय संस्था वणीच्या चेअरमन कर्मा तेलंग, चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचा रुपाली कातकडे, सरपंचा आशा जुनगरी (गणेशपूर), महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे, शहर काँग्रेस अध्यक्षा श्यामा तोटावार, गणेशपूर जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका विणा पावडे, कोतवाल विजया ठाकरे, सुनिता बोढे, रुपाली आवारी, अंगणवाडी सेविका मनिषा घोटकर, ग्रा.प. सदस्या विद्या विधाते, सुरेखा बलकी, विद्या भगत, करिश्मा आसुटकर, वर्षा घाटे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपाच्या सत्रात महिला व लहान मुलामुलींकरिता वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळच्या सत्रात समाज प्रबोधनकार व सप्तखंजेरी वादक डॉ. रामपाल महाराज धारकर यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार संजय देरकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाला गणेशपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत खारकर, माजी सरपंच तेजराज बोढे, गुरुदेव सेनेचे दिलीप भोयर, पोलिस पाटील बबन कौरासे, ग्रामसेवक दगडू पवार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गणेशपूर येथे आयोजित क्रां. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment