Latest News

Latest News
Loading...

मावळत्या वर्षाच्या सायंकाळी काळाचा घाला, घोन्सा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील घोन्सा येथील रहिवाशी असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतात सर्व जण लिन असतांना नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला हा भीषण अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भद्रावती येथील आपल्या नातेवाईकांच्या भेटीला गेलेलं हे कुटुंब रात्री नातेवाईकाच्या मालिकेच्याच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून नातेवाईकाच्या घरी दुचाकीने परत जात असतांना नागपूर चंद्र्पुर महामार्गावरील भद्रावती शहरालगत असलेल्या डॉली पेट्रोलपंप जवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश भाऊराव नागपुरे (५१), मंजुषा सतिश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे (२ वर्ष) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. या घटनेने घोन्सा या गावात शोककळा पसरली आहे. 

भद्रावती येथे नातेवाईकांच्या भेटीला गेलेलं नागपुरे कुटुंबं नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर दुचाकीने त्यांच्या घरी परतत होतं. दरम्यान भद्रावती शहरालगत असलेल्या डॉली पेट्रोलपंप जवळ महामार्गावर वळण घेत असतांना त्यांच्या दुचाकीला (MH २९ A ९९४९) भरधाव ट्रकने (MH ४० K २०९५) जोरदार धडक दिली. यात दुचाकी वरील मंजुषा भाऊराव नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक सतिश भाऊराव नागपुरे व माहिरा राहुल नागपुरे यांचा रुग्णालयात हलवितांना मृत्यू झाला. तसेच स्मायली कामतवार ही सात वर्षीय बालिका या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. मावळत्या वर्षाच्या सायंकाळी एकत्र आलेला हा परिवार सोबत जेवण करून घरी परतत असतांना कुटुंबातील तीन जणांवर काळाने घाला घातला. त्यांची नातेवाईकांसोबतची ही भेट शेवटची ठरली. दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला व चिमुकल्या माहिरासह तिच्या आजी आजोबाला काळाने कायमचे हिरावून घेतले. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने घोन्सा या गावात शोककळा पसरली आहे. नागपुरे परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरु असतांना मावळत्या वर्षाच्या सायंकाळी एकाच कुटुंबातील तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक चालक नंदू चव्हाण रा. पुसद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.