घरासमोर वाद घालणाऱ्या बापलेकांना हटकणाऱ्या तरुणालाच बापलेकांनी लाकडी दांड्याने मारून जखमी केल्याची घटना शहरातील खडबडा मोहल्ला येथे १० डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत तरुणाने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
रुपेश ज्योतीराम किनाके (२८) हा खडबडा मोहल्ला येथे परिवारासह राहतो. त्याच्या शेजारी गेडाम कुटुंबं वास्तव्यास आहे. १० डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास रुपेश हा घरी असतांना विजय भारत गेडाम (२५) व भारत गेडाम (५०) हे पिता पुत्र रुपेश याच्या घरासमोर वाद घालत होते. यावरून रुपेश याने त्या दोघांनाही माझ्या घरासमोर वाद कशाला घालता असे म्हटले असता बापलेकांनी त्यांचा राग रुपेश त्याच्यावर काढला. भारत गेडाम याने रुपेशचे हात पकडून ठेवले, व विजय गेडाम याने हातातील लाकडी दांडा रुपेशच्या नाकावर मारला. त्यामुळे रुपेशच्या नाकातून रक्तस्त्राव होऊन त्याच्या नाकाला दुखापत झाली आहे. याबाबत रुपेशने दोघाही बापलेकांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी भारत गेडाम व विजय गेडाम या बापलेकांवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: