प्रशांत चंदनखेडे वणी
पायदळ शेतात जात असलेल्या शेतकऱ्याला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. यात शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला, हाताला व डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तात्काळ सेवाग्राम येथे हलविण्यात आले. मात्र सेवाग्राम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रामदास गणपत पचारे (५६) रा. चिचमंडळ ता. मारेगाव असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना ३ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत १० डिसेंबरला पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मारेगाव तालुक्यातील चिचमंडळ येथे कुटुंबासह राहत असलेले रामदास पचारे हे ३ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता शेतात जाण्याकरिता निघाले. चिचमंडळ बस स्टॉप जवळून रस्ता ओलांडून ते शेताकडे जात असतांना खैरी कडून मार्डी कडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर मार लागला. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून रस्ता ओलांडणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक शेतकऱ्याचा पुतण्या अतुल वाल्मिक पचारे (२८) याने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी दुचाकी चालक उमेश कवडूजी केराम (४०) रा. रानवड ता. राळेगाव जि.यवतमाळ याच्यावर बीएनएसच्या कलम १०६(१), २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील मारेगाव पोलिस करीत आहे.
No comments: