टायगर अभी जिंदा है, विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : धर्मा उर्फ धर्मेंद्र काकडे
जनतेच्या विश्वासाचा नेता म्हणून ओळखले जाणारे वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
विश्वासभाऊ नांदेकर यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे. राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या विश्वासभाऊ यांनी वेळेनुसार आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल केला आहे. राजकारणातील आपल्या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांची एक वेगळी ओळख कायम आहे. राजकीय वलय प्राप्त असलेले विश्वासभाऊ हे मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जातात. वणी विधानसभा क्षेत्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. आमदार असतांना त्यांनी जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याला प्रथम प्राधान्य दिलं. आजही ते जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ताकदीने आवाज उठवितात. शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन ते पेटून उठतात. आजही त्यांच्याशी एक मोठा वर्ग जुळला आहे. निष्ठावान कार्यकर्ता अजूनही त्यांच्या सोबत आहे. आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना चकित करणारे विश्वासभाऊ कार्यकर्त्यांच्या मनातील टायगर आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गर्वाने म्हणतात की टायगर अभी जिंदा है. जनकार्यात आजही ते तेवढेच तत्पर आहेत. जनतेच्या न्याय हक्कांसाठी आजही ते रस्त्यावर उतरतात. वेळ पडल्यास आक्रमक भूमिकाही घेतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात आजही त्यांच्याप्रती विश्वास कायम आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणारे विश्वासभाऊ आजही लोकांच्या मनात विश्वासाचं घर करून आहेत. जनतेशी विश्वासाची नाळ जुळून असलेल्या विश्वासभाऊ नांदेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शुभेच्छुक :- धर्मा उर्फ धर्मेंद्र काकडे, विश्वासभाऊंचा विश्वासू कार्यकर्ता तथा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स
No comments: