आगीत घर जळालेल्या कुटुंबाला आमदार संजय देरकर यांनी दिली भेट, प्रशासनाला पंचनामा करण्याचे दिले निर्देश
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील कृष्णानपूर येथील एका मजुराच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील सर्व वस्तू व साहित्य जळून खाक झाले. संपूर्ण घरच आगीत भस्मसात झाल्याने मजूर चांगलाच चिंतेत आला. आगीत घर जळाल्याने मजुराचा संसार उघड्यावर आला. ही माहिती वणी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी कृष्णानपुर येथे जाऊन मजुर व त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रशासनाला घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. योग्य पंचनामा करून आगीत मजुराच्या झालेल्या नुकसानीची आकडेवारी तयार केल्यानंतर त्याला संभाव्य मदत मिळावी असा अहवाल तयार करण्याच्या संजय देरकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
तालुक्यातील कृष्णानपूर येथे परिवारासह राहत असलेल्या बाबाराव महादेव पाचभाई या शेतमजुराच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं. सुदैवानी जीवितहानी टळली. आगीत घर भस्मसात झाल्याने मजुराचा संसार उघड्यावर आला. ही माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी कृष्णानपुर येथे जाऊन पाचभाई कुटुंबाची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. तसेच प्रशासनाला घटनास्थळाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून आगीत झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केल्यानंतर मजुराला संभाव्य मदत मिळवून देण्याकरिता पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन संजय देरकर यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र इद्दे यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments: