प्रशांत चंदनखेडे वणी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १० वे जिल्हा अधिवेशन शहरातील नगाजी महाराज सभागृहात पार पडले. या अधिवेशनात ऍड. कुमार मोहरमपुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हासचिव पदी फेरनिवड करण्यात आली. चळवळीच्या कार्यकर्त्याकडेच परत जिल्हासचिव पदाचा पदभार सोपविल्याने पक्षातील अन्य कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वणी येथे घेण्यात आलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या अधिवेशनात कॉ. डी.बी. नाईक, कॉ. अनिता खुणकर, कॉ. चंद्रशेखर सिडाम यांनी अध्यक्षीय मंडळाची जबाबदारी पार पाडली. तर कॉ. किसन गुजर हे या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच कॉ. सुनिल मालुसरे, कॉ. अजित नवले, कॉ. रमेश मिरासे, कॉ. निरंजन गोंधलेकर, कॉ. उषा मुरके, कॉ. देविदास मोहकर, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. प्रीती करमरकर, कॉ. सरिता दानव हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ऍड. कुमार मोहरमपुरी यांनी पक्षाचा तीन वर्षाचा संघटनात्मक व राजकीय अहवाल मांडला. त्याला उपस्थितांनी आपली मते मांडून पाठिंबा दिला. अधिवेशनाची सुरुवात माकपचे प्रतिक असलेल्या विळा-हातोडा चिन्ह व संघर्षाचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करून झाली. ध्वजारोहण कॉ. खुशालराव सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पक्षाचे महासचिव कॉ. सिताराम येचुरी, प.बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, यवतमाळ जिल्ह्याचे जेष्ठ नेते कॉ. शंकर दानव यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कॉ. सुनिल मालुसरे व कॉ. अजित नवले यांची मार्गदशनपर भाषणे झाली. तसेच प्रमुख पाहुण्यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनात ऍड. कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप पचारे, ऍड. डी. बी. नाईक, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, अनिता खुणकर, मनोज काळे, कवडू चांदेकर, खुशाल सोयाम, मनिष इसाळकर, उषा मुरके, सदाशिव आत्राम, गजानन ताकसांडे, दयाराम जाधव, रामभाऊ जिद्देवार, प्रीती करमरकर या सतारा जणांच्या जिल्हा कमिटीत ऍड. कुमार मोहरमपुरी यांची जिल्हासचिव पदी तर विठ्ठल ढवस, बादल कोडापे, आशिष पिदूरकर यांची निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनाला महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
🙏धन्यवाद साहेब
ReplyDelete