Latest News

Latest News
Loading...

नगर पालिकेने थकबाकी करावर व्याज आकारणी बंद करावी, युवासेनेची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

निर्धारित कालावधीत मालमत्ता व पाणीकर न भरल्यास नगर पालिका थकबाकी रक्कमेवर अतिरिक्त व्याज लावून कर वसूल करीत असल्याने नागरिक चांगलेच अडचणीत आले आहेत. नगर पालिकेकडून थकबाकी कराच्या रक्कमेवर प्रचंड व्याज लावण्यात येत असल्याने सामान्य नागरिक विवंचनेत आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे कराचा भरणा करू न शकलेल्या करधारकांकडून व्याजासह कर वसूल करण्यात येत असल्याने सामान्य जनता डबघाईस आली आहे. त्यामुळे थकबाकी मालमत्ता व पाणी करावर व्याज न लावता नगर पालिकेने नियमित आकारलेला करच नागरिकांकडून घ्यावा, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. 

नगर पालिका वेळेत मालमत्ता व पाणीकर न भरलेल्या करधारकांच्या मूळ रक्कमेवर व्याज आकारते. थकबाकी करधारकांकडून व्याजासह कराची रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे शक्य होत नाही. थकबाकी करावर नंतर भरमसाठ व्याज वाढत जाते व नागरिक कमालीचे अडचणीत येतात. मालमत्ता व पाणीकर न भरल्यास नगर पालिका नंतर सक्तीची भूमिका घेते. नागरिकांकडून नियमित आकारलेला कर घेण्याऐवजी थकबाकी करावर प्रचंड व्याज आकारले जात असल्याने नागरिकांना भरमसाठ व्याजासह कराची रक्कम भरणे कठीण जाते. सर्वसामान्य करधारक आर्थिक परिस्थितीमुळे निर्धारित वेळेत कर भरू शकत नाही. त्यामुळे सामान्य करधारकांवर व्याज न लादता नियमित आकारलेला कर घेणे अपेक्षित असतांना नगर पालिका त्यांच्यावर व्याज आकारून आर्थिक भुर्दंड लादत आहे. परिणामी सामान्य करधारक चांगलेच विवंचनेत आले आहेत. तेंव्हा थकबाकी करावर व्याज न लावता नगर पालिकेने नियमित आकारलेला करच नागरिकांकडून घ्यावा, अशी मागणी करतांनाच थकबाकी करावर व्याज आकारणी बंद न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी न.प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

No comments:

Powered by Blogger.