Latest News

Latest News
Loading...

गोवंश जनावरांचे शीर आढळले आणि गोवंशाची कत्तल होत असल्याचे झाले उघड, पोलिसांनी आठ आरोपींना घेतले ताब्यात

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील जत्रा मैदान रोडवरील चौपाटी बार जवळ रस्त्याच्या कडेला गोवंश जनावरांचे दोन शीर आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती. गोवंश जनावरांच्या शिर व मांसाचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर वायरल झाल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. खुल्या जागेवर गोवंशाचे धडावेगळे शीर आढळल्याने जन माणसातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा प्रकार समोर येताच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेची जोरदार मागणी केली. घटनास्थळावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी अतिशय संयमाने प्रकरण हाताळले. घटनास्थळी हजारो नागरिक जमा झाले होते. या विक्षिप्त प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमधून कमालीचा रोष व्यक्त होतांना होता. पोलिसांनी जमावाला शांत करतांनाच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. या आठही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

शनिवार ११ जानेवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जत्रा मैदान रोडवरील चौपाटी बार जवळ रस्त्याच्या कडेला काही तरुणांना गोवंश जनावरांचे दोन शीर पडून दिसले. हे तरुण गोवंशाच्या शिरासोबत सेल्फी काढत असतांना काही नागरिकांना दिसून आले. त्यामुळे या मार्गाने मार्गक्रमण करणारे लोक तेथे थांबू लागले. पाहता पाहता लोकांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली. दरम्यान गोवंश जनावरांच्या शिराचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाले. त्यानंतर ही वार्ता संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. गोवंश जनावरांचे उघड्यावर शीर पडून असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात आणखी शोध घेतला असता त्यांना जत्रा मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस पडून असल्याचे दिसून आले. तसेच तेथे असलेल्या एका टिनाच्या शेडमध्ये गोवंशाचे शेकडो शीर व हाडे दिसून आली. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. जत्रा मैदान परिसरात अजूनही कत्तलखाने चालवून गोवंशाची कत्तल केली जात असल्याचे समोर आल्याने कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. घटनास्थळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एसडीपीओ गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहेरानी हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी हिंदुत्ववादी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते व हजारो नागरिक जमले होते. पोलिसांना या सर्वांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हे कुर कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच संतप्त जमावाला पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. योग्य प्रकारे परिस्थिती हाताळल्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. या आठही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. आरोपींचा शोध घेण्याकरिता यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी येथे तळ ठोकून होतं. गुन्हे शोध पथकानेही आरोपींचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका वठवली. तपास यंत्रणांनी आरोपींचा कसून शोध घेत अवघ्या काही तासांतच त्यांना जेरबंद केले. यातील काही मुख्य आरोपी फरार असल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिस त्यांचाही कसून शोध घेत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.