Latest News

Latest News
Loading...

नगर पालिकेने दीपक चौपाटी परिसरात राबविली अतिक्रमण हटाव मोहीम

प्रशांत चंदनखेडे वणी 

नगर पालिकेने सोमवार दिनांक १३ जानेवारीला दीपक चौपाटी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. दीपक चौपाटी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या चिकन विक्रीच्या दुकानांवर जेसीबी चालविण्यात आला. तसेच दीपक चौपाटी पासून गोकुळनगर पर्यंत रस्त्यालगत असलेली सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. तर काही अतिक्रमण धारकांना आपली अतिक्रमणे हटविण्याकरिता चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दीपक चौपाटी व जत्रा मैदान परिसरातील रस्त्यांना अतिक्रमणाने विळखा घातल्याने नगर पालिकेने ऍक्शन मोडवर येत रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणावर आज जेसीबी चालविला. त्यामुळे अतिक्रमित जागेवर व्यवसाय थाटून बसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय उध्वस्त झाल्याने ते कमालीचे चिंतेत आले आहेत. 

नगर पालिकेने दीपक चौपाटी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. रस्त्यालगत असलेली सर्व अतिक्रमणे यावेळी हटविण्यात आली. गोकुळ नगर परिसरातील भंगार व्यावसायिकांच्या वस्तू व साहित्याने रस्त्यालगतचा संपूर्ण परिसर व्यापला होता. भंगार व्यावसायिकांनी रस्त्याच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. या भंगार व्यावसायिकांच्या अतिक्रमणावरही जेसीबी चालविण्यात आला. तसेच रस्त्याच्या कडेला पडून असलेले साहित्य उचलण्याकरिता त्यांना चार दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. त्याच्याप्रमाणे दीपक चौपाटी परिसरातील सर्व चिकन विक्रीची दुकाने व दीपक चौपाटी ते गोकूनलनगर पर्यंतची रस्त्यालगत असलेली बहुतांश दुकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहे. नगर पालिका मुख्याधिकारी सचिन गाडे, उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्यासह नगर पालिकेचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून दीपक चौपाटी परिसरातील अतिक्रमण हटविले. 

नगर पालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी, वणी वाहतूक उपशाखेच्या एपीआय सिता वाघमारे यांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. अतिक्रमणावर नगर पालिकेने जेसीबी चालविल्याने अतिक्रमित जागेवर व्यवसाय थाटून बसलेले व्यवसायिक कमालीचे संकटात आले आहेत. त्यांचे चालते व्यवसाय उद्धवस्त झाल्याने त्यांच्यापुढे उदर्निवाहाचे संकट उभे ठाकले आहे. पक्के अतिक्रमण करून असलेल्या व्यावसायिकांना अतिक्रमण हटविण्याकरिता चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अन्यथा त्यांचे अतिक्रमणही जेसीबी लावून हटविण्यात येणार आहे.   



No comments:

Powered by Blogger.