वणी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचे तडफदार व लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
मनमिळाऊ व्यक्तिमत्व व कुशल नेतृत्व म्हणून लोकप्रिय ठरलेल्या संजयभाऊ देरकर यांनी वणी मतदार संघातून दणदणीत विजय संपादन केला. जनतेने आपल्या हक्काचा लोक प्रतिनिधी म्हणून संजूभाऊ यांची निवड केली. संजयभाऊ देरकर यांनी लोकभावनेतून केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळाली. त्यांनी लोकसांसाठी केलेल्या निस्वार्थ कार्याने प्रभावित होऊन जनतेने त्यांना आपला आमदार म्हणून निवडले. आमदार झाल्यानंतरही संजूभाऊ यांच्या मूळ स्वभावात तिळमात्रही बदल झाला नाही. ते आजही जनतेत मनमोकळेपणाने घुळमिळतात. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात. त्यांचे सर्व हट्टाहासही पुरवितात. मतदार संघातील छोट्यात छोटया कार्यक्रमातही ते हिरीरीने सहभागी होतात. कुणालाही ते नाराज करीत नाही. कुणीही कुठेही आमंत्रित केले तरी त्यांनी नाही हा शब्द कधी उच्चारला नाही. आमदार झाल्यनंतरही त्यांचे जराही हावभाव बदलले नाहीत. आजही ते पूर्ण मतदार संघ पिंजून काढतात. नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्या सोडविण्यातही तत्परता दाखवितात. मतदार संघातील प्रश्न सोडविण्याला ते प्रथम प्राधान्य देतात. हसतमुख व्यक्तीमत्व असलेले संजयभाऊ हे सामान्य व्यक्ती प्रमाणेच जनतेत वावरतात. त्यामुळे आमदार म्हणून एक हक्काचा आधार मिळाल्याचं समाधान जनतेतून व्यक्त होत आहे. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थकी लावण्याचे पूर्ण प्रयत्न संजयभाऊ करतील यात कुठलेही दुमत नाही. "जनतेसाठी काहीपण" हा त्यांचा अजेंडा आजही कायम असल्याचे त्यांच्या जनतेप्रती असलेल्या तळमळीवरून दिसून येते.
अशा या झुंझार, तडफदार व कर्तव्यदाक्ष आमदार संजयभाऊ देरकर यांचा आज वाढदिवस आहे. ते नेहमी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतात. कुठलाही व्यर्थ खर्च ते वाढदिवसावर करीत नाही. वाढदिवसाला पुष्पगुच्छ न आणता वही पेन आणण्याच्या नवीन संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्यामुळे आधार मिळेल हा त्यांचा निस्वार्थ भाव. कार्यकर्त्यांनाही त्यांनी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यास सांगितले आहे. यावेळी त्यांच्या पुढाकारातून भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. आरोग्य तपासणी व मोफत औषोधोपचार या शिबिरात करण्यात येणार आहे. नागरिक गंभीर आजारातून बरे व्हावे, हा या शिबिराच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. जनतेची काळजी वाहणाऱ्या जनसेवी आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.शुभेच्छुक :- वणी मतदारसंघातील सर्व शिवसेना (उबाठा) पदाधिकारी, महिला पदाधिकारी व सर्व शिवसैनिक
Comments
Post a Comment