मॅकरून इंग्रजी माध्यमिक शाळेत स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल महोत्सव

प्रशांत चंदनखेडे वणी 

इंग्रजी माध्यमिक शिक्षणात अग्रेसर असलेल्या मॅकरून शाळेत स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २० ते २४ जानेवारी पर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे. या क्रीडा महोत्सवाचे आज २० जानेवारीला थाटात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण अवगत व्हावे, या दृष्टिकोनातून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणासोबतच मैदानी खेळातही विद्यार्थ्याची रुची निर्माण व्हावी या उद्देशाने शाळा व्यवस्थापनाने हा भव्य क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. 

मॅकरून स्टुडंट अकॅडमी सीबीएसई शाळेत २० जानेवारी पासून स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल महोत्सवाला सुरुवात झाली. २४ जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या क्रीडा महोत्सवात नर्सरी ते इयत्ता ५ विच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ, मैदानी खेळ, कवायती, रिले रेस, टपाल रेस, रनिंग, लेगन स्पून, बनी रेस, वाशिंग मशीन गेम, फुटबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर इयत्ता ६ ते १० विच्या विद्यार्थ्यांकरिता सांघिक खेळांसह विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन असणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांचा आनंद द्विगुणित करण्याकरिता वैविध्यपूर्ण खाद्य खजाना असलेला आनंद मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान विशेष अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळ व आनंदाचा खजाना असलेला हा स्पोर्ट्स फेस्ट कार्निवल महोत्सव विद्यार्थी व पालकांच्या आठवणीत साठवून ठेवण्यासारखा राहणार आहे. तेंव्हा या क्रीडा महोत्सवाला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मॅकरून शाळेचे संचालक पी.एस. आंबटकर व मुख्याध्यापिका शोभना यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी