वणी मतदार संघातील नागरिकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिक्षक प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. वणी मतदार संघातील जनतेने या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. दुर्धर व गंभीर आजार असलेल्या रुग्णांना सावंगी मेघे येथील आचार्य विनोभा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले. याठिकाणी रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. तसेच काही गंभीर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना नंदेश्वर देवस्थान येथे वेगवेगळ्या दिवशी बोलावून त्यांच्यावर तेथेच डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. 

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वणी तालुका आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या संयुक्त विद्यमनातून हे महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सावंगी मेघे येथील शशांक गोतरकर, डॉ. एन.पी. शिंगणे, शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा संघटक सुनिल कातकडे यांच्यासह  शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात आरोग्य तपासणी व रुग्णांवर उपचारही करण्यात आले. गंभीर आजारग्रस्त रुग्णांवरही या शिबिराच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले. तसेच काही दुर्धर आजार जडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याकरिता त्यांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या शिबिराचा जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. आरोग्य तपासणी व उपचाराकरिता लागणारा खर्च पेलवणारा नसल्याने सर्वसामान्य नागरिक हे आजारांशी झुंजत असतात. अशा नागरिकांना आजारापासून मुक्ती मिळावी व त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे या दृष्टिकोनातून हे महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं. 

या महाआरोग्य शिबिरात वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. विवेक गोफणे, वणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समिर थेरे, मारेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे, झरी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, मारेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष इंगळे, डॉ. विलास बोबडे, बालू दुधकोहले तसेच आशा सेविका व आरोग्य सेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रुग्णांना सेवा पुरविली. वणी उपविभागातील डॉक्टरांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी