कंपनीतून कपात केलेल्या कामगारांचे आमरण उपोषण, कामगार नेते संजय खाडे यांनी दर्शविला जाहीर पाठिंबा

प्रशांत चंदनखेडे वणी 

एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईंट वेंचर प्रा.लि. या कंपनीत काम करणाऱ्या ६५ कामगारांना कंपनीने अचानक कामावरून कमी केल्याने ते कमालीचे चिंतेत आले असून त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदर्निवाहाचे संकट निर्माण झाले आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची अचानक कपात केल्याने कंपनीच्या भूमिकेविरोधात सर्व कामगार एकवटले असून २७ जानेवारी पासून हे कामगार कंपनी समोर उपोषणाला बसणार आहेत. या अन्यायग्रस्त कामगारांनी कंपनी विरोधात घेतलेल्या भूमिकेला कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे संजय खाडे यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे. 

एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईंट वेंचर प्रा.लि. या कंपन्या वेकोलिशी संलग्न असून त्यांना वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत निलजई खुल्या कोळसाखाणीत ओबी उत्खननाचे कंत्राट मिळाले आहे. मागील ५ वर्षांपासून या कंपन्या वणी नॉर्थ क्षेत्रात ओबी उत्खननाचे काम करीत आहे. या कंपन्यांमध्ये शेकडो कामगार काम करतात. मात्र या कंपनीत काम करणारे ६५ कामगार कंपनीने अचानक कामावरून कमी केले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात हे सर्व कामगार एकवटले आहेत. कंपनीने अकारण कामावरून कमी केल्याने कामगारांनी २७ जानेवारी पासून कंपनी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता पासून हे सर्व कामगार उपोषणाला बसणार आहेत. या कामगारांनी कंपनी विरोधात घेतलेल्या भूमिकेला संजय खाडे यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. 

कामगारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, संजय खाडे 

वेकोलिसाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या. वेकोलिने शेतजमिनी अधिग्रहित केल्याने शेतकरी, शेत मजूर व स्थानिकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. वेकोलिच्या कोसळाखाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची स्थानिकांना मोठी झळ सोसावी लागते. प्रदूषणामुळे शेत पिकांचेही अतोनात नुकसान होत असून स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कोळसाखाणींच्या निर्मिती करीता स्थानिकांनाही मोठा त्याग करावा लागला आहे. वेकोलिच्या उन्नतीत स्थानिकांचाही मोठा वाटा आहे. असे असतांनाही वेकोलिशी संलग्न असलेल्या कंपनीत रोजगार देतांना स्थानिकांना डावलले जाते. एवढेच नाही तर आता कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तेंव्हा हा अन्याय आता कदापिही सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कामगार नेते संजय खाडे यांनी मांडली आहे.  

कंपनीने कामावरून कमी केलेल्या कामगारांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. कंपनीने ६५ कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. कंपनीने कामगारांना कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर प्रभाकर खोब्रागडे, संजय पारशिवे, कान्हू तामगाडगे, महेश गोवरदिपे, अनिल डोंगे, योगेश कामतवार, प्रकाश इंगोले, सुरेश पारशिवे, वासुदेव चिडे, किसन खेडेकर, अरुण डाहूले, प्रवीण कातरकर, श्रीकांत निंदेकर, संजय व-हाटे, प्रकाश नागोसे, रवि गुरनुले, संदीप नांदे, संजय वासनकर, आकाश गोबाडे, तुळशीदास धांडे, सुनील कातरकर, विजय खुटेमाटे, दिलिप काकडे, गणेश सातपुते, भाऊराव काकडे, मिथून निब्रड, विशाल गोवारदिपे, पुरुषोत्तम पाचभाई, राजू ढपकर, वैभव खाडे, हरिभाऊ खेडेकर, संतोष राजूकर, अनिल बोबडे, अरुण असिनकर, दीपक खुसपुरे, सुभाष पिंगे, गणेश पारशिवे, मंगेश देरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी