प्रशांत चंदनखेडे वणी
तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. 21 जानेवारीला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मयूर संजय खापे (26) रा. गणेशपुर रोड वणी असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
शहरातील गणेशपुर रोड वरील रंगारीपुरा परिसरत वास्तव्यास असलेल्या या तरुणाने नैराश्येतून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरुण हा खाजगी रुग्णालयात काम करायचा. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहत होता. मोठा भाऊ कामावर गेल्यानंतर त्याने घराच्या आड्याला गळफास लावून जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याने गळफास घेतल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या मोठ्या भावाला फोन करून ही माहिती दिली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
No comments: