२३ जानेवारीला शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा, बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त युवासेनेचे (उबाठा) आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेच्या वतीने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात २३ जानेवारीला सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकारातून घेण्यात येत आहे. 

ही मॅरेथॉन स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. खुल्या गटात पुरुष व महिलांचा समावेश असेल. तर दुसरा गट १६ वर्षांखालील मुलामुलींसाठी राहणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहे. प्रथम बक्षीस ३००० रुपये, द्वितीय बक्षीस २००० रुपये, तृतीय बक्षीस १५०० रुपये तर चतुर्थ बक्षीस १००० रुपये असणार आहे. तसेच प्रथम १० विजयी स्पर्धकांना मोमेंटो देऊन गौरविण्यात येणार आहे. तेंव्हा या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केले आहे. 

गोल्ड मेडलिस्ट मनस्वी पिंपरे हिचं भव्य स्वागत 

याच दरम्यान स्केटिंग स्पेशालिस्ट मनस्वी पिंपरे हिचं युवासेनेकडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. स्केटिंगमध्ये १०० पेक्षाही जास्त सुवर्ण पदक पटकावणारी मनस्वी बोटोणी ते वणी असा ३० किलोमीटरचा प्रवास स्केटिंग करून पूर्ण करणार आहे. मनस्वी ही मुळची बोटोणी येथील रहिवाशी असून सध्या ती पुणे येथे राहते. ती बोटोणी वरून वणी पर्यंत तब्बल ३० किमी स्केटिंग करणार आहे. तिने जिद्दीने केलेल्या पराक्रमाची प्रेरणा व आदर्श तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. स्केटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेल्या मनस्वी हिचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेनेकडून भव्य स्वागत करण्यात येणार आहे. छोट्याश्या गावातून आपल्या जिद्द व पराक्रमाने नावलौकिक मिळविलेल्या मनस्वीच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी