स्केटिंग चॅम्पियन मनस्वीचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार जंगी स्वागत
प्रशांत चंदनखेडे वणी
कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वी ही बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटरचे अंतर स्केटिंग करून गाठणार आहे. मनस्वीने बाल वयातच पराक्रमाचं उंच शिखर गाठलं आहे. तिने आपल्या पराक्रमाने गाव व तालुक्याचं नाव उंचावलं आहे. कुणालाही हेवा वाटावा असं कर्तृत्व तिनं केलं आहे. स्केटिंगमध्ये १०४ सुवर्ण पदकं पटकावणारी मनस्वी तरुण पिढीला संदेश देण्याकरिता व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता बोटोणी वरून वणी येथे स्केटिंग करीत येत आहे. तिच्या जिद्द व पराक्रमाचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाल स्केटिंग पटूचं शहरात भव्य स्वागत करणार आहे. तिच्या स्वागताची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी हुरहुन्नरी व कर्तबगार मुलामुलींना यशस्वी वाटचालीकरता नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. मनस्वीने कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याबद्दल तिचे अभिनंदन करतांनाच ती यशाचे नवनवीन शिखर गाठत राहावी, याकरिता राजू उंबरकर हे तिला शुभेच्छा देणार आहेत.
मनस्वी ही जिद्द, चिकाटी व सकारात्मक विचारांचं मुर्तिमंद उदाहरण आहे. वडिलांचा अपघात झाल्यानंतर त्यांना कायमच अपंगत्व आलं. घरची परिस्थिती जेमतेम. तरीही परिस्थितीने खचून न जाता तिने संघर्षाची वाट धरली. तिने आत्मविश्वाला तडा जाऊ दिला नाही. तिला स्केटिंगची प्रचंड आवड व गोडी होती. तिची स्केटिंगमध्ये असलेली रुची पाहता वडिल विशाल पिंपरे हे त्याही परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अवघ्या साडेतीन वर्षात तिला स्केटिंगचा जीवापाड छंद लागला. पाहता पाहता ती स्केटिंगमध्ये तरबेज झाली. नंतर ती स्केटिंगच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. स्पर्धांमध्ये पदकं पटकावू लागली. स्केटिंगच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तिने गोल्ड मेडल पटकाविले. मनस्वी नंतर रोलिंग स्केटिंगची चॅम्पियन म्हणून नावारूपास आली. आजतागायत तिने रोलिंग स्केटिंगमध्ये १०४ सुवर्ण पदकं पटकावले आहेत. २०२१ मध्ये तिला इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळाले. २०२३ मध्ये तिला नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मिळाली. तिने जमिनीपासून केवळ साडे सहा इंच उंची मधूनही स्केटिंग केली आहे. हा कार्तिमान केल्याने वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकमध्ये तिचं नाव नोंदविल्या गेलं आहे. तिने याआधी बोटोणी ते मारेगाव हे १२ किमी नंतर स्केटिंग करून पार केले होते.त्यामुळे परिस्थितीचा बगलबुवा व परिस्थितीने खचून जाणाऱ्या तरुणांपुढे ती एक आदर्श ठरली आहे. तरुण पिढीला संदेश व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता ही बाल स्केटिंग मास्टर बोटोणी ते वणी हे ३० किमी अंतर स्केटिंग करून पार करीत शहरात येत आहे. तिचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात भव्य स्वागत करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांनी यशस्वी जीवन घडविण्याची जिद्द बाळगणाऱ्या तरुणांना नेहमी प्रोत्साहन व आधार दिला आहे. धाडस व जिद्द बाळगणाऱ्या तरुणांच्या पाठीशी राजू उंबरकर हे नेहमी ढाल बनून उभे राहिले आहेत. यशस्वी वाटचाल करणाऱ्या तरुणांना त्यांनी नेहमी प्रेरणा दिली आहे. मनस्वीच्याही जिद्द व पराक्रमाला गोंजारण्याकरिता तसेच ती यापुढेही यशाचे असेच शिखर गाठत राहावी, या शुभेच्छा देण्याकरिता राजू उंबरकर हे मनस्वीचं शहरात भव्य स्वागत करणार आहेत.
Comments
Post a Comment