प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहदा ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुरवार दि. ९ जानेवारीला सकाळी ११ वाजता किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत कचराकुंडी वाटप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सरपंच वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या हस्ते व सरपंच वर्षा राजूरकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसडीपीओ गणेश किंद्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून एपीआय अश्विनी रायबोले, शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे, सुभाष लोखंडे, सुषमा अरके, मनोज उरकुडे, राहुल मानकर, श्रीराम वाघमारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रा.प. सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष यांचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेला विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments: