प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या उकनी कोळसाखान परिसरात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. ७ जानेवारीला सकाळ पाळीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. उकनी कोळसाखाणीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती नंतर वन विभागाला दिली. कोळसाखान परिसरात मृत वाघ आढळल्याची वार्ता सगळीकडे पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. उकनी कोळसाखानीच्या आर.सी. कार्यालयाजवळून जातांना माता मंदिर परिसरात जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. १२ ते १३ दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष लावण्यात आला आहे. मृत वाघाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असल्याचेही वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळीच वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मृत वाघाच्या शरीराचे नमुने घेतल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे वाघाचा अंत्यविधी करण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उप वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
उकनी कोळसाखाणीतील आर.सी. कार्यालयाजवळील माता मंदिर परिसरात एक पट्टेदार वाघ मुतावस्थेत आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत या वाघाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत वाघ दिसताच कोळसाखाणीतील कर्मचाऱ्यांचीही चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी ही माहिती लगेच आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. वाघ मृतावस्थेत आढळल्याची माहिती वन विभागाला मिळताच पांढरकवडा वन विभागाचे उप वनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक वनसंरक्षक व्ही,व्ही.खाडे, वणी वनपरिक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक ए.यु. देशमुख, मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श.ग. हटकर, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी, क्षेत्र संरक्षक एस.आर. राजूरकर, वनरक्षक एस, ए. वाघ (वणी बिट), वनरक्षक एस. डी. कतुरे (शिरपूर बिट) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानांतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. राठोड, डॉ. ए.ए. पाटील, डॉ. एम. के. डहाके, डॉ. डी.पी. बावणे यांनी वाघाच्या मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन केले. वाघाच्या मृतदेहाचे नमुने घेतल्यानंतर वाघाचा शासकीय नियमाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
No comments: