जन्मदात्या बापाला लोखंडी रॉडने मारून केले जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
जन्मदात्या बापाला मुलाने लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना शहरातील रंगनाथ नगर येथे २३ जानेवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वडिलांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
रंगनाथ नगर येथे कुटुंबासह राहत असलेले किशोर मारोतराव राऊत (५६) हे रोजमजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले आहेत. त्यांचा मधवा मुलगा हा भांडखोर स्वभावाचा असून तो नेहमी वडिलांशी भांडत असतो. शुल्लक कारणांवरून वडिलांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करतो. २५ जानेवारीला तर त्याने हद्दच पार केली. रात्री जेवणाच्या वेळी भाजी वरून त्याने वडिलांशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर लोखंडी रॉड वडिलांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. पोटच्या मुलाने लाथाबुक्क्यांनी व विटेने जबर मारहाण करून घराबाहेर काढण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याने किशोर राऊत यांनी पत्नीसह पोलिस स्टेशनला येऊन आपल्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. किशोर राऊत यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी त्यांचा मुलगा स्वप्नील किशोर राऊत (२९) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment