धमन्यांतील रक्त सळसळविणारा अंजली भारती यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात सुप्रसिद्ध कव्वालकार व गायिका अंजली भारती यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भिमकन्या व भिमाची वाघीण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या अंजली भारती यांचा अलीकडच्या काळात वणी येथे पहिल्यांदाच कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. बाबासाहेबांनी देशासाठी व देशवासियांसाठी दिलेलं योगदान कणखरपणे आपल्या पहाडी आवाजात जनतेपुढे मांडणाऱ्या अंजली भारती यांचे प्रबोधनात्मक गीत, गजल व शायरी एकूण धमन्यांतील गोठलेलं रक्तही उसळी मारायला लागतं. बहुजनांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष व आज लोकशाही मार्गाने मिळालेले हक्क व अधिकार घेऊन गुरगुरणारी मानवी प्रवृत्ती कशी महापुरुषांच्या विचारधारेशी विसंगत होऊ लागली आहे, यावर अंजली भारती या आपल्या गीतांमधून थेट प्रहार करतात. महापुरुषांच्या विचारांचं प्रबोधन करणाऱ्या अंजली भारती यांच्या प्रबोधनपर गीत गायनाच्या कार्यक्रमाला महापुरुषांची शिकवण जोपासणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या संतोष पेंदोर यांच्या पुढाकारातून अंजली भारती यांचा प्रबोधनपर गीतातून जोश भरणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक शिक्षक प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या मागील विशाल मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अंजली भारती या अलीकडच्या काळात पहिल्यांदाच वणी येथे कार्यक्रम घेत असल्याने सर्वांनाच या कार्यक्रमाची ओढ लागली आहे. अंजली भारती यांची गीत, गजल व शायरी श्रोत्यांमध्ये जोश भरणारी असतात. महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित त्यांची गीते ऐकून ऐकणाऱ्यांचीही छाती फुगून येते. त्यांच्या गीतातून एक वेगळीच ऊर्जा मिळते. महापुरुषांचे विचार आपल्या पहाडी आवाजातून गीतांच्या रूपात ऐकविणाऱ्या अंजली भारती यांचा हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम खास वणी उपविभागातील जनतेसाठी आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment