डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ देखील ७६ व्या प्रजासत्ताक दीना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी घटनाकाराच्या पुतळ्याला हारार्पण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. देवानंद झाडे, उल्हास पेटकर, मनोज मोडक यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी.के. टोंगे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, गित घोष, नारायण गोडे, रफिक रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मोरेश्वर देवतळे, सुरेश रायपुरे, करुणा कांबळे, प्रिया लभाने, पुष्पा आत्राम, रमेश मडावी, राजू कांबळे, शिवाजी दुपारे, नईम अजीज, श्रीकृष्ण सोनारखन, हरिश पाते, डॉ. आनंद वेले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झिया अहेमद यांनी केले. सूत्रसंचालन कु. सिमा कुमरे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज मोडक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कपिल मेश्राम, रविंद्र कांबळे, विवेक गाडगे, संदीप दुपारे, अंकित पाझारे, तन्मय लामसोगे, रमेश काटकर, प्रणिता काळे, नंदिनी ठमके, राजू चाफडे, मिलिंद चिकाटे, राहुल परगंटीवार यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment