युवा तडफदार कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड, शिवसैनिक ललित लांजेवार यांचे व्ह्रदय विकाराने निधन
प्रशांत चंदनखेडे वणी
युवा तडफदार नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या ललित लांजेवार यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने २९ जानेवारीला रात्री निधन झाले. राजकीय क्षेत्रात उभरते युवा नेतृत्व म्हणून ललित लांजेवार यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शिवसेनेचे (शिंदे गट) ते शहर प्रमुख होते. हसतमुख व सोज्वळ स्वभाव असलेल्या ललित लांजेवार यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचं महत्वपूर्ण कार्य राहिलं आहे. त्यांच्या आकस्मात एक्झिटने शहरातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने मित्र परिवार व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वांनाच धक्का बसला. ते अचानक सर्वांना सोडून गेल्याने शहरात दुःखाची लाट पसरली आहे. विद्यार्थीदशेपासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा पदाधिकारी हा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. नागरिकांचे प्रश्न व समस्यांवर ते प्रखरतेने आवाज उठवायचे. जनतेच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. जनतेचे प्रश्न उचलून धरणारा हा कार्यकर्ता आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मात्र त्यांचं कार्य नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुले व मोठा आप्त परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचं वय अवघ्या ४३ वर्षाचं होतं. सुस्वभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेल्या ललित लांजेवार यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment