Latest News

Latest News
Loading...

सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३५ महिला पुरुषांनी केले रक्तदान

प्रशांत चंदनखेडे वणी 

छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम तथा मराठा सेवा संघ वणीच्या विद्यमाने स्थानिक धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सामाजिक उपक्रमांतर्गत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व वंदन केल्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. 

नागपूर येथील लाईफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून या शिबिरात रक्त संकलन करण्यात आले. डॉ. अपर्णा साखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलनाची जबादारी पार पाडली. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते ग्रामगीता व शिवधर्म दिनदर्शिका देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा आरोग्य कक्ष प्रमुख अरुण डवरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या शिबिराला छ. संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष अशोक पिंपळशेंडे, संचालक मारोती मोडक यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. 

या रक्तदान शिबिरात नितेश ठाकरे, सुभाष गेडाम, राकेश वैद्य, रामदास भोयर, रवि लाडसे, नितीन मोवाडे, सुनील बोर्डे, ऍड.अमोल टोंगे, अभय पानघाटे, प्रवीणकुमार, नितीन धाबेकर, दत्तात्रय पुलेनवार,अमोल लोखंडे, कैलास देठे, मंगेश खामनकर, ऍड.अमोल कळसकर, नरेश मुरस्कर, प्रवीण मेश्राम, प्रणय निब्रड, महेश मोवाडे, सुरेंद्र बुचे, योगेश डाखरे, श्रीकांत गोहोकार, कृष्णदेव विधाते, विलासराव शेरकी, संदीप गोहोकार, सुनील बोर्डे, नितीन आवारी, विनोद वैरागडे, जीवन चौधरी, अवंती जिवतोडे, रंजना जिवतोडे, सानू जिवतोडे, प्रतीक्षा भोयर त्यांच्यासह  31 पुरुष व 4 महिलांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेकरिता छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम व मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

No comments:

Powered by Blogger.