Latest News

Latest News
Loading...

निंबाळा फाट्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेले दोनही मित्र दगावले


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोनही दुचाकीस्वारांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना एकाचा १० जानेवारीला रात्री उशिरा तर दुसऱ्याचा ११ जानेवारीला पहाटे मृत्यू झाला. वणी वरून मारेगाव तालुक्यातील पाहपळ या आपल्या गावी परतत असतांना निंबाळा फाट्याजवळील रुद्राक्षवनाच्या गेट जवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकी वरील दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले होते. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर काही तासांच्या अंतरात दोघांनीही शेवटचा श्वास घेतला. विजय संभाजी थेरे वय अंदाजे ३५ वर्षे व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे २८ वर्षे अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. 

शेतकरी असलेले व एकमेकांच्या घराशेजारी राहणारे हे दोन्ही मित्र ७ जानेवारीला रात्री १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने पाहपळ या आपल्या गावी जात असतांना वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात हे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले होते. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या निंबाळा येथील नागरिकांनी  त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने दोघांनाही नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. नागपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरु असताना एकाने १० जानेवारीला रात्री उशिरा तर दुसऱ्याने ११ जानेवारीला पहाटे शेवटचा श्वास घेतला. चार दिवसांपासून त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. दोन मित्रांचा असा हा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाहपळ या गावात शोककळा पसरली आहे. थेरे व पायघन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

No comments:

Powered by Blogger.