अनोळखी कॉल पासून सावध राहण्याचे ठाणेदार अनिल बेहेरानी यांचे आवाहन
प्रशांत चंदनखेडे वणी
ऑनलाईन फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. सायबर चोरटे विविध शक्कली लढवून बँक खात्यातील पैसे उडवू लागले आहेत. त्यामुळे मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक ओपन करू नये किंवा अनोळखी नंबर वरून फोन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याबद्दलची माहिती, खाजगी माहिती अथवा ओटीपी नंबर सांगू नये. तसेच सुरवातीला १४० क्रमांक असलेला फोन कॉल आल्यास तो उचलू नये, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
सायबर चोरट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना शासन प्रत्येक माध्यमातून देत आहे. सायबर चोरटे मोबाईलवर फोन करून बोलण्यात गुंतवतात आणि वैयक्तिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच लिंक ओपन करायला सांगून ओटीपी विचारात. ओटीपी सांगताच सायबर चोरटे बँक खात्यातील पैसे उडवितात. त्यामुळे अनोळखी कॉल करणाऱ्यांना बँक खात्याविषयी किंवा वयक्तिक अशी कुठलीही माहिती देऊ नये. सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सायबर चोरटे नागरिकांशी फोनवर संवाद साधून बँक खात्यातील रक्कम परस्पर उडवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी कॉल पासून सतर्क राहणं गरजेचं झालं आहे. अनोळखी नंबर वरून फोन करणाऱ्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती देऊ नये. तसेच १४०९३२०६७१ या क्रमांकावरून फोन आल्यास तो उचलू नये. कारण या क्रमांकावरून येणारे कॉल हे फ्रॉड कॉल आहेत. या कॉलमुळे आपली फसवणूक होऊ शकते. बँक खात्यातील पैशाची ऑनलाईन चोरी होऊ शकते. त्यामुळे अनोळखी कॉल पासून सावधानता बाळगण्याचे आवाहन वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment