प्रशांत चंदनखेडे वणी
मोटारसायकल अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. ७ जानेवारीला रात्री १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्याजवळ घडली. वणी वरून मारेगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोनही मित्र गंभीर जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येते. दोघांनाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील रहिवाशी असलेले हे दोनही जण दुचाकीने आपल्या गावी परतत असतांना निंबाळा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात हे दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली की दुचाकी अनियंत्रित होऊन ते रोडवर पडले याबाबत कुठलाही निष्कर्ष अद्याप लागला नाही. दुचाकीला जनावर आडवे आल्याने हा अपघात झाला असावा असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच निंबाळा गावच्या सरपंचासह पोलिस पाटील व गावातील नागरिक घटणास्थळी पोहचले. सरपंचांनी रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या एपीआय अश्विनी रायबोले यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी कर्तव्यावरील पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. जखमींना आधी मारेगाव येथे हलविण्यात आले. तर नंतर त्यांना वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला तात्काळ तर दुसऱ्याला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. ते दोघेही शेतकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. विजय संभाजी थेरे वय अंदाजे ३५ वर्षे व नितीन खुशाल पायघन वय अंदाजे २८ वर्षे असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. वणी मारेगाव मार्गावरील लालपुलिया ते निंबाळा फाटा हे अपघात प्रवणस्थळ बनले असून याठिकाणी नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: