राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
प्रशांत चंदनखेडे वणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी संपूर्ण देशात शाहिद दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या ७७ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांना शहरातही अभिवादन करण्यात आले. वणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गांधी चौक येथे अभिवादन सोहळा घेण्यात आला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं असून त्यांनी स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या लढ्यातुनच देश स्वतंत्र झाला. सन १९४८ मध्ये महात्मा गांधी हे प्रार्थनेला जात असतांना त्यांची हत्या करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांची पुण्यतिथी शाहिद दिवस म्हणून साजरी केली जाते.
वणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे अभिवादन सोहळा घेऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, वणी शहर सेवादलचे अध्यक्ष प्रमोद लोणारे, वणी शहर कार्याध्यक्ष अशोक पांडे, ओम ठाकूर, शरद मंथनवार, प्रेम तोडकर, सुरेश बन्सोड, मेघश्याम तांबेकर, निवृत्ती ठावरी ताठ काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment