Latest News

Latest News
Loading...

पोलिस जमादाराच्या धमकीमुळे ललित लांजेवार यांना आला व्ह्रदय विकाराचा झटका, पत्नीचा खळबळजनक आरोप


प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख ललित लांजेवार यांचा २९ जानेवारीला हृदय विकाराच्या झटक्याने अनपेक्षितपणे मृत्यू झाला होता. आता त्यांच्या मृत्यूबाबत काही रहस्यमय खुलासे होऊ लागले आहेत. काही खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. वणी पोलीस स्टेशन मधील एका पोलिस जमादाराने ललित लांजेवार यांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने त्याचा धसका घेऊन त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचा गंभीर आरोप दिवंगत ललित लांजेवार यांची पत्नी श्रीरंगी ललित लांजेवार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जातून केला आहे. पोलिस जमादाराच्या धमकीचा धसका घेऊन एका राजकीय पक्षाचा शहर प्रमुख असलेल्या युवकाला हार्ट अटॅक आल्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिवंगत ललित लांजेवार यांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्या त्या पोलिस जमादारावर कार्यवाही करण्याची मागणी देखील श्रीरंगी लांजेवार यांनी तक्रार अर्जातून केली आहे. 

सहा ते सात दिवसांपूर्वी "वणी पोलिस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया" या मथळ्याखाली एका वृत्तपत्राने बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी ललित लांजेवार यांनी काही ग्रुपवर फॉरवर्ड केली. या बातमीत वणी पोलिस स्टेशन मधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे रेती तस्करीशी जोडण्यात आली होती. मात्र ते रेती तस्कर असल्याचे अद्याप तरी सिद्ध झाले नाही. ललित लांजेवार यांनी ग्रुपवर बातमी फॉरवर्ड केल्याने जमादार विकास धडसे यांनी त्यांना ऍट्रॉसिटी ऍक्ट या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. दिवंगत ललित लांजेवार यांना पोलिस जमादार विकास धडसे यांनी तू माझं काही करू शकत नाही, तुला एखाद्या ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फसविणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे विकास धडसे यांच्या धमकीची ललित लांजेवार यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. जमादार विकास धडसे यांनी दिलेल्या धमकीबाबत ललित लांजेवार यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) विनोद मोहितकर व महेश कुचेवार यांनाही सांगितले होते. एवढेच नाही तर ललित लांजेवार यांनी विकास धडसे यांची यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे देखील तक्रार केली होती. मात्र तरीही ललित लांजेवार यांच्या भीतीचं निसरण झालं नाही. विकास धडसे यांच्या धमकीने राजकारणात सक्रिय असलेले ललित लांजेवार हे प्रचंड घाबरले. आणि यातच ते अस्वस्थ होऊन त्यांना व्ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याचा आरोप त्यांची पत्नी श्रीरंगी लांजेवार यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जातून केला आहे.
विकास धडसे यांची धमकी मनाला लावून घेतल्यानेच ललित लांजेवार यांचा व्ह्रदय विकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करीत श्रीरंगी लांजेवार यांनी जमादार विकास धडसे यांना ललित लांजेवार यांच्या मृत्यूस कारणीभूत धरून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. जमादार विकास धडसे यांच्या धमकीची ललित लांजेवार यांनी प्रचंड धास्ती घेतली होती. विकास धडसे हे ऍट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवतील या भीतीपोटी काळजीत राहणाऱ्या ललित लांजेवार यांना हार्ट अटॅक आला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप दिवंगत ललित लांजेवार यांची पत्नी श्रीरंगी लांजेवार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जातून केला आहे. 

No comments:

Powered by Blogger.