Latest News

Latest News
Loading...

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेला मिळाला राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार

प्रशांत चंदनखेडे वणी 

सहकार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला सर्वोत्तम कामकाजाबाबत "बँको ब्यू रिबीन" हा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाने केलेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे ही पतसंस्था प्रगतीच्या शिखरावर पोहचली आहे. या पतसंस्थेची प्रगतीपथाकडे निरंतर सुरु असलेली वाटचाल बघता पतसंस्थेला हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. 

लोणावळा (पुणे) येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक व अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे यांच्या उपस्थितीत तथा माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेला उत्कृष्ठ कामकाजबाबत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, परीक्षित एकरे, घनश्याम निखाडे, भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अंडेलवार, अरविंद ठाकरे, सुनिल देठे, छाया ठाकूरवार, निमा जीवने यांच्यासह पतसंस्थेतील सर्व कर्मचारी व अभिकर्त्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे. 



No comments:

Powered by Blogger.