प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर देतांनाच प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याच्या सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिना निमित्त शासकीय मैदानावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात टीएचओ डॉ. समिर थेरे यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिना निमित्त शासकीय मैदानावर दरवर्षी महसूल विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल विभागाकडून सन्मानित करण्यात येते. यावेळी टीएचओ डॉ. समिर थेरे यांना आरोग्य क्षेत्रात उत्कुष्ट कार्य केल्याबद्दल व निवडणूक काळात विशेष योगदान दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार निखिल धुळधर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
टीएचओ डॉ. समिर थेरे यांनी निवडणूक काळात प्रत्येक बुथवर व स्ट्रॉंग रूम बाहेर उत्तम सेवा दिली. त्यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांनीही निवडणूक काळात महत्वाचे योगदान दिले. निवडणूक काळात आरोग्य विभागाने दिलेली सेवा व योगदानाबद्दल महसूल विभागाने डॉ.समिर थेरे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. त्यांचा आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments: