एलसीबी पथकाने चोरट्यांच्या टोळीचा केला पर्दाफाश, वणी व शिरपूर हद्दीतील गुन्ह्यांसह ११ गुन्हे केले उघड
प्रशांत चंदनखेडे वणी
संपूर्ण जिल्ह्यात चोरी व घडफोडीच्या घटना घडवून आणणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पर्दाफाश केला असून अट्टल चोरट्यांना चोरीतील मुद्देमालासह अटक केली आहे. या चोरट्यांनी संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. कुलूपबंद मकान व दुकानांना टार्गेट करून हे चोरटे चोरीचा डाव साधत होते. चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने चोरट्यांचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. तसेच चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याकरिता पोलिसांवर दबावही वाढू लागला होता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चोरी व घरफोडींच्या घटनांचा छडा लावण्याचे आदेश दिल्यानंतर एलसीबी पथकाने चोरी व घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या धडक कार्यवाहीत एलसीबी पथकाने ३४५.१ मिली ग्राम सोने व २०० मिली ग्राम चांदीच्या वस्तू चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. यात वणी व शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. वणी नॉर्थ क्षेत्रातील वेकोलि कर्मचारी दोनदा घरफोडीचा शिकार बनला होता. चोरट्यांनी दिवसाढवळ्या वेकोलि कर्मचाऱ्याचे सुंदर नगर येथील क्वार्टर फोडून २४ ग्राम सोने व ४० हजार रोख असा मुद्देमाल लंपास केला होता. तर याच वेकोलि कर्मचाऱ्याचे जिल्हा परिषद कॉलनी येथील घर फोडून चोरट्यांनी ९ तोळे सोने व रोख ४५ हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला होता. या दोनही घरफोडीच्या घटना एलसीबीने उघडकीस आणल्या असून चोरट्यांना अमरावती येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी १० लाख ३६ हजार रुपयांचे सोने व तीन मोबाईल जप्त केले आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीचा एलसीबी पथकाने पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून या चोरट्यांना अटक करून १ चोरी व १० घरफोडी असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात वणी व शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांचाही समावेश आहे. वेकोलि कर्मचारी गोपाळ बाळकृष्ण भुसारी यांचे ३ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या सुंदर नगर येथील क्वार्टर फोडून चोरट्यांनी २४ ग्राम सोने व ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. तर ६ डिसेंबरला रात्री चोरट्यांनी त्यांचे जिल्हा परिषद कॉलनी येथील घर फोडून ९ तोळे सोने व ४५ हजार रुपारे रोख असा मुद्देमाल चोरून नेला होता. या घरफोडी प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या एलसीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. दोनही अट्टल चोरट्यांना अमरावती येथून अटक करण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारीला एलसीबी पथकाचे पोउपनि धनंजय हाके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंकज राजू गोंडाणे (२८) रा. चवरे नगर अमरावती व सागर जनार्दन गोगटे (३४) रा. गांधी चौक अमरावती, ह.मु. कारंजा जि. वाशीम यांना एलसीबी पथकाने अमरावती येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या चोरट्यांनी गोपाळ भुसारी यांचे क्वार्टर व घर फोडल्याचे एलसीबी पथकाच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. पथकाने त्यांच्या जवळून ११९.१२० मिली ग्राम सोन्याचे दागिने किंमत १० लाख ३६ हजार रुपये व ३ मोबाईल किंमत २१ हजार रुपये असा एकूण १० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाही करीता वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थागुशा पो. नि. सतीश चवरे, यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष मनवर, सपोनि गजानन गजभारे, पोउपनि धनराज हाके, गजानन राजमल्लू, शरद लोहकरे, पो.अं. योगेश गटलेवार, सय्यद साजिद, बंडू डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाड, रितुराज मेढवे, निलेश राठोड, विनोद राठोड, आकाश सहारे, रुपेश पाली, योगेश डगवार, अक्ष सूर्यवंशी, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सुनील खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदूरकर, उल्हास कुरकुटे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनीकांत मडावी नरेश राऊत, सतिश फुके व सर्व एलसीबी पथकाने केली.
Comments
Post a Comment