Latest News

Latest News
Loading...

पोलिस स्टेशनमध्ये जप्तीत असलेल्या तीन दुचाक्यांसह ४०० किलो लोखंडी भंगाराचा लिलाव

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलीस स्टेशनमध्ये अनेक दिवसांपासून जप्तीत असलेल्या तीन दुचाकी व ४०० किलो लोखंडी भंगाराचा प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाने १६ फेब्रुवारीला लिलाव करण्यात येणार आहे. सन २०२१ व २०२२ मध्ये विविध गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेली वाहने पोलिस स्टेशनच्या आवारात जागच्याजागी जिर्ण होऊ लागली आहेत. ही वाहने आता भंगारात जमा होऊ लागली आहेत. त्यामुळे या दुचाकी वाहनांचा व ४०० किलो लोखंडी भंगराचा लिलाव करण्यात येत आहे. 

आरोपींनी गुन्ह्यांमध्ये वापरलेली वाहने किंवा कागदपत्र नसतांना पोलिसांनी जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी न्यायालयात मूळ कागदपत्र सादर करून सोडवून न नेल्यास ती पोलिस स्टेशनमध्येच जमा होऊन राहतात. कुणीही मालकी हक्क सिद्ध करू न शकलेल्या बेवारस वाहनांनी पोलिस स्टेशनचे आवर पूर्णपणे व्यापले आहे. तसेच लोखंडी भंगारानेही मोठी जागा व्यापली आहे. पोलिस स्टेशन आवारात आता गुन्ह्यात जप्त केलेली वाहने लावण्याकरिता जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नव्याने गुन्ह्यात जप्त केलेली वाहने कुठे ठेवायची हा पेच पोलिसांसमोर निर्माण होऊ लागला. पोलिस स्टेशन आवारात अनेक दिवसांपासून जप्तीत असलेली वाहने पूर्णतः जिर्ण होऊन ती भंगारात जमा होऊ लागली आहेत. त्यामुळे या दुचाकी वाहनांचा व ४०० किलो बेवारस लोखंडी भंगाराचा प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पोलिस स्टेशन आवारातील ४०० किलो भंगारासह टीव्हीएस व्हिक्टर, हिरोहोंडा स्प्लेंडर, होंडा पॅशन या तीन बेवारस दुचाक्यांचाही यावेळी लिलाव करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीला ही लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. 

No comments:

Powered by Blogger.