ट्रकची दुचाकीला धडक, प्रसंगावधान राखल्याने तरुण थोडक्यात बचावला

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतुकीच्या ट्रकने मोटारसायकला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १३ फेब्रुवारीला ४.३० ते ४.४५ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील ब्राह्मणी फाटा येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. दुचाकी मात्र ट्रकच्या मागील चाकाखाली आली. 

कोलारपिंपरी कोळसाखाणीतून रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणारा ट्रक (MH २९ BE ९९८८) कोळसाखाणीत कोळसा भरण्यासाठी जात असतांना ब्राह्मणी फाटा वळण रस्त्यावर उभ्या दुचाकीला (MH २९ Z ५७८८) ट्रकने जबर धडक दिली. वाहन चालकाच्या बेजबाबदारपणे वाहन चालविण्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येते. मुख्य रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभा असलेला हा तरुण ट्रक चालकाच्या दृष्टीस पडू नये, याचेच नवल वाटते. वळण घेतांना ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली आली. मात्र दुचाकीस्वार हा सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. दुचाकीस्वार हा भालर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येते. त्याचे नाव मात्र कळू शकले नाही. कोळसा वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे अपघातात वाढ झाली असून निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. कोळसा वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर लगाम लावण्याची मागणी होऊ लागली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी