घरासमोर शिवीगाळ करणाऱ्याला जाब विचारल्याने केली लोखंडी टॉमीने मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
घरासमोर विनाकारण शिवीगाळ करणाऱ्याला जाब विचारल्याने त्याने जाब विचारणाऱ्या तरुणालाच लोखंडी टॉमीने मारून जखमी केल्याची घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाकोरी (बोरी) या गावात घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथे राहणाऱ्या आकाश दादाराव आसुटकर (२५) याचा गावातील भास्कर रामचंद्र वासेकर (४७) याच्यासोबत जुना वाद होता. हा वाद उकरून काढत तो नेहमी आकाशला नकळत शिवीगाळ करायचा. १२ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता आकाश हा घरसमोरील रस्त्यावर फोनवर बोलत असतांना भास्कर वासेकर हा त्याच्या घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला. माझं कोण काय करू शकतं, अशा वल्गना करीत तो अप्रत्यक्षपणे आकाशवर निशाणा साधू लागला. अशातच आकाशचा भाऊ आकाश जवळ आल्यानंतर त्याने तू कुणाला म्हणत आहे, असा जाब विचारताच भास्करने आकाशला दोन थापडा मारल्या आणि तो तिथून निघून गेला. नंतर आकाश व त्याचा भाऊ रस्त्याने समोर जात असतांना भास्करने त्यांना रस्त्यात गाठले व आकाशला लोखंडी टॉमीने मारहाण करण्यास सुरवात केली. टॉमी आकाशच्या डोक्यावर मारण्यात आल्याने आकाश जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याबाबत आकाशने १३ फेब्रुवारीला पोलिस स्टेशनला येऊन भास्कर विरोधात तक्रार नोंदविली. आकाशच्या तक्रारी वरून पोलिसांनी भास्कर वासेकर याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment