प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील चिखलगाव जिल्हा परिषद प्राथमिक (सेमी इंग्रजी) शाळेचा विद्यार्थी पवन दिपक कष्टी हा जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत चमकला. जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा दिग्रस येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत ६ ते ११ वयोगटात लांब उडी या खेळप्रकारात पवन कष्टी या विद्यार्थ्याने जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावून शाळेचा, गावाचा व तालुक्याचा मान वाढविला आहे. या कर्तृत्वान विद्यार्थ्याचा चिखलगाव बोधेनगर वासियायांतर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय स्पर्धा गाजविल्यानंतर या विद्यार्थ्याला आता विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याची उत्सुकता लागली आहे.
जिल्हा परिषद शाळा चिखलगावचा विद्यार्थी असलेल्या पवन कष्टी याने दिग्रस येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेत ६ ते ११ वर्षे वयोगटातून लांब उडी या खेळात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चिखलगाव बोधे नगर वासियांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन या विद्यार्थ्याने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल त्याचा सत्कार केला. या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देणारे ठरावे या उद्देशाने हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चिखलगाव ग्रा.प. सदस्य संतोष राजूरकर, प्राथ. शाळा राजूरचे मुख्याध्यापक महेश लिपटे, विनोद पाचभाई, सुभाष जगताप, दिपक कष्टी, दशरथ मांदाडे, देवेंद्र लांबट, विनोद पारखी, सचिन कवाडे, सुरेश कनाके, श्याम कुत्तरमारे, रोहित गेडाम, सुनिल टोंगे, वैभव राजूरकर आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
No comments: