फुरसे जातीच्या सापाला सर्प मित्रांनी दिले जीवनदान
प्रशांत चंदनखेडे वणी
दुर्मिळ होत चाललेल्या फुरसे जातीच्या सापाला सर्प मित्रांनी जीवनदान दिले. भारतातील मुख्य चार विषारी सापांपैकी एक असलेला हा साप सुंदरनगर येथील श्रीराम मंदिराजवळ आढळला. या सापाला एमएच २९, हेलपिंग हॅन्ड्स ग्रुपच्या सर्प मित्रांनी रेस्क्यू करून जंगल परिसरात सोडले.
सुंदरनगर येथील श्रीराम मंदिराजवळ नागरिकांना साप आढळून आल्याने त्यांनी सर्प मित्रांना फोन करून साप पकडण्याकरिता बोलाविले. सर्प मित्र क्षणाचाही विलंब न करता साप आढळलेल्या ठिकाणी पोहचले. तेथे त्यांना दुर्मिळ होत चाललेला फुरसे जातीचा साप आढळून आला. या सापाचे आवडते खाद्य हे विंचू आहे. विंचवाला भक्ष करतांना या सापाला अनेकदा विंचवाच्या दंशाचाही सामना करावा लागतो. परंतु विंचवाचे जहर पचविण्याची क्षमता या सापात आहे. इकडे विंचवांची संख्या कमी होत चालल्याने फुरसे जातीच्या सापांचीही संख्या घटू लागली आहे. मात्र कोकणात विंचवांची संख्या जास्त असल्याने हा साप कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतो. या सापाला इंग्रजीत SAW SCALED असे म्हटले जाते. SAW म्हणजे करवत. या सापाची त्वचा करवती सारखी असल्याने त्याला SAW SCALED म्हटले जाते. ही माहिती सर्प मित्रांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना दिली. त्यानंतर सर्प मित्रांनी सापाला रेस्क्यू करून जीवनदान दिले. सर्प मित्रांनी रेस्क्यू केलेला फुरसे जातीचा हा साप वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दाखवून व वन विभागात त्याची नोंद करून त्याला नैसर्गिक परिसरात सोडण्यात आले.एमएच २९, हेलपिंग हॅन्ड्स सर्प मित्र ग्रुपचे वन्यजीव रक्षक रमेश भादीकर व राजू भोगेकर, अनिकेत कुमरे, नितीन माणूसमारे, समिर गुरनुले, संतोष गुमुलवार, दिवेन्द्र भोगेकर, अमोल, रोहित, दीपक आशिष दिनेश यांनी ही रेस्क्यू प्रकिया पार पाडली.
Comments
Post a Comment