चक्क त्याने विवाहितेलाच दिला लग्नाचा प्रस्ताव, तिच्या मुलीवरही होती त्याची वाईट दृष्टी, युसुफवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
विवाहित महिलेवर वाईट नजर ठेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतांनाच तिला लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या एका पन्नास वर्षीय मजनूवर वणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उतरत्या वयात रंगीन मिजाज ठेवणारा हा युवक एका विवाहित महिलेवर वाईट नजर ठेऊन होता. तिला आपल्या जाळ्यात अडकविण्याचे सर्व मनसुबे विफल ठरल्यानंतर त्याने सरळ तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला. तू आपल्या पतीला व मुलीला सोडून दे, मी तुझ्याशी संसार थाटतो, असे निर्लज्यपणे त्याने त्या महिलेला म्हटले. विवाहित महिलेवर फिदा झालेल्या या युवकाने महिलेला भाळण्याचा हरसंभव प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला घास न टाकल्याने त्याने निर्लज्यपणाचा कळस गाठला. तो महिलेच्या २४ वर्षीय मुलीवर देखील डोळे ठेऊ लागला. तिला इशारे व डोळे मारण्याइतपत तो निर्ढावला होता. त्याची टपोरीगिरी वाढतच गेल्याने शेवटी त्याच्या अशा या निर्लज्य वागण्याला कंटाळून महिलेने सरळ त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी युसूफ खान सुबेदार खान रा. इंदिरा चौक याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
युसुफची विवाहित महिलेवर नजर फिरली. तो तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेला भाळण्याचा त्याने हरसंभव प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला घास न टाकल्याने त्याने सरळ तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. मै तेरेसे शादी करता हू, तू तेरे पती और बेटी को छोड दे, अशी त्याने निर्लज्यपणे तिला मागणी घातली. एवढेच नाही तर त्याने निर्लज्यपणाची हद्दच पार केली. त्याची महिलेवर तर वाईट नजर होतीच, पण तिच्या मुलीवरही त्याची नियत फिरली. तो तिच्या मुलीलाही इशारे व डोळा मारून लज्जा निर्माण होईल असे कृत्य करू लागला. त्यामुळे महिला त्याच्या टपोरीगिरीला प्रचंड वैतागली होती. शेवटी महिलेने युसूफ खान याच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी युसूफ खान सुबेदार खान याच्यावर बीएनएसच्या कलम ७४, ७५, ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सुदामा आसोरे हे करीत आहे.
Comments
Post a Comment