सिंधी कॉलनी येथील राहत्या घरून सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील सिंधी कॉलनी येथे राहत्या घरी पोलिसांनी धाड टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही मंगळवार दि.१८ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते ८.१० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या कार्यवाहीत पोलिसांनी १ लाख ६ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. रोहित सुभाष तारुणा (२८) रा. गुरुनानक नगर, सिंधी कॉलनी असे या पोलिसांनी अटक केलेल्या तंबाखू तस्कराचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शहरात सुगंधित तंबाखूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. सुगंधित तंबाखूचा साठा करून त्याची अवैध विक्री करण्यात येते. सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा व इतर प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणारं एक रॅकेटच शहरात सक्रिय असल्याचं दिसून येते. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व गुटखा  शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. सुगंधित तंबाखूच्या तस्करी व अवैध विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेकांचे हात या धंद्यात गुंतले आहेत. सुगंधित तंबाखूच्या तस्करीतून तस्कर व शहरातील अवैध विक्रेते गब्बर बनले आहेत. प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा शहरातील पान टपऱ्यांवरून सर्रास विकला जात आहे. अवैध विक्रेते मनमर्जी दर आकारून त्यांना सुगंधित तंबाखू उपलब्ध करून देतात. तस्करांनी शहरात सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीचे अड्डे थाटले आहेत. या अड्ड्यांवरून शहारत सुगंधित तंबाखू व गुटख्याचा मुबलक पुरवठा केला जातो. 

शहरातील सिंधी कॉलनी येथे राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैधरित्या साठा करून ठेवण्यात आला असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गोपाल उंबरकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदारांनी पोलिस पथकाला सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकाने सिंधी कॉलनी येथील राहत्या घरी धाड टाकली असता तेथे त्यांना सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी सीमा राम सुतकर यांच्या समक्ष जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूची पडताळणी केल्यानंतर आरोपी रोहित सुभाष तारुणा या तंबाखू तस्कराला अटक करून त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी मजा १०८ सुगंधित तांबाखू किंमत १ लाख ६ हजार ५१० रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशावरून पोउपनि शेखर वांढरे, स.फौ. सुरेंद्र टोंगे, पोहेका मारोती पाटील, दीपक मडकाम, पोकॉ. शाम राठोड, विजय गुजर, महेश बाडलवार, प्रफुल नाईक, मपोना जया रोगे यांनी केली   


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी