भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा दुर्दैवी मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास वणी वरोरा महामार्गावरील दामोदर नगर जवळ घडली. विजय भदुजी आत्राम वय अंदाजे ४४ वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. महामार्ग ओलांडताना त्याला वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

वणी येथील टोल नाक्यावर काम करणारा हा युवक कामाच्या तासिका पूर्ण करून दामोदर नगर येथे आपल्या घरी परतत असतांना त्याचा अपघात झाला. दामोदर नगर जवळील फुटलेले दुभाजक असलेल्या ठिकाणावरून रस्ता ओलांडतांना भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती मिळाली आहे. विजय आत्राम हा काही वर्षांपूर्वी वाहन चालक म्हणूनही काम करायचा. सध्या तो वणी येथील टोल नाक्यावर कार्यरत होता. २२ फेब्रुवारीला कामाच्या तासिका पूर्ण करून तो पायीच घराकडे निघाला. दामोदर नगरकडे जाण्याकरिता रस्ता क्रॉस करतांना त्याला भरधाव वाहनाने धडक दिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजय आत्राम हा कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या पत्नीला जबर धक्का बसला. तिला दुःख अनावर झाले. तिच्या जीवनाचा आधार असलेला  पती अचानक तिला सोडून गेल्याने काही वेळ तिची शुद्ध हरपली होती. विजयचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने पत्नीसह संपूर्ण कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विजय आत्राम याच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. 

अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजय आत्राम याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. चंद्रपूर येथे त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. २३ फेब्रुवारीला कुटुंबीयांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्यावर अंतिम संस्कार केले. घडलेल्या घटनेची २३ फेब्रुवारीला रात्री पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी