Latest News

Latest News
Loading...

दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेस द्वारा सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात गायत्री नरेंद्र पारोधी या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला आहे. तर प्रगती विजय कठाने व आयशा प्रकाश उठलावार या विद्यार्थिनींनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. सामान्य ज्ञान स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षिका निशा शेख, शीतल रामगिरवार, सविता क्षिरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी राकेश दिकुंडवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व आपलं ज्ञान त्यांना समाजसमोर प्रगट करता यावं याकरिता दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश दिकुंडवार यांनी केले. 

No comments:

Powered by Blogger.