प्रशांत चंदनखेडे वणी
खातेरा (अडेगाव) येथील सधन शेतकरी आणि व्यावसायिक गजानन जोन्नलवार यांचं रविवार दि. १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ७० वर्षांचं होतं. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार आहे. आज दुपारी १२ वाजता खातेरा येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. गजानन जोन्नलवार हे सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आदरातिथ्य करणारा माणूस सर्वांना सोडून गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments: