अखेर मोरेश्वर उज्वलकर यांचा पक्ष प्रवेश, शिवसेनेच्या (उबाठा) स्वप्नपूर्ती सोहळ्यात बांधले शिवबंधन
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर उज्वलकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. त्यांच्या पक्ष प्रवेशाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यांनी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
एस.बी. लॉन येथे पार पडलेल्या भव्य स्वप्नपूर्ती सोहळ्यात मोरेश्वर उज्वलकर यांनी खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत दिमाखात पक्ष प्रवेश केला. मोरेश्वर उज्वलकर यांचं राजकीय व सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. राजकीय क्षेत्रातही ते नेहमी सक्रिय राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी अध्यक्ष पदावर काम केले आहे. त्यावेळी संजय देरकर यांच्या नेतृयत्वाखाली त्यांनी पक्षात निष्ठेने कार्य केलं होतं. तर आताही आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव बघता आमदार संजय देरकर यांनी त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित केला. मोरेश्वर उज्वलकर यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेला (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्रात आणखी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केला. मोरेश्वर उज्वलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांमधूनही आनंद व समाधान व्यक्त होतांना दिसत आहे.
राजकीय व सामाजिक योगदान
मोरेश्वर उज्वलकर हे या क्षेत्रातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्यात त्यांचं नेहमी योगदान राहिलं आहे. ते सामाजिक कारकर्ते व राजकीय नेतृत्व म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून अनेक उपक्रमही राबविले आहेत. त्यांचा व्यापक जनसंपर्क व नेतृत्वगुणांच्या आधारावर त्यांना पक्ष कार्याची जबादारी देण्यात आली आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) आणखी बळकट होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Comments
Post a Comment