Latest News

Latest News
Loading...

विद्यार्थी व शिक्षणासाठी पुरेशी तरतूद नसणाऱ्या अर्थसंकल्पाचा एआयएसएफ कडून निषेध

प्रशांत चंदनखेडे वणी 

केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात विद्यार्थी व शिक्षणासाठी पुरेशी तरतूद न करता या योजनांवरील खर्चात कपात करण्यात आल्याने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनकडून या अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरकार विरोधात निदर्शने देण्यात आली. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. 

केंद्र सरकारने संसदेत २०२५-२०२६ हा अर्थ संकल्प सादर केला. यात भांडवलदार व उच्च मध्यम वर्गांना आयकरमध्ये सूट देण्यात आली. मात्र याची भरपाई करण्याकरिता गरीब वर्ग व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांवरील खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे. अप्रत्यक्षपणे इतर कर वाढविण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य व रोजगार हमी योजनांवरील खर्चात कपात करण्यात आल्याने ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कडून केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचा तिव्र निषेध करण्यात आला. शिवतीर्थ चौक येथे निषेध आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात तिव्र निदर्शने देण्यात आली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अथर्व निवडींग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शरद अंड्रस्कर, कुणाल केमेकर, कार्तिक अंड्रस्कर, आर्यन चहानकर, भूषण पेटकर, सुरज काटकर, रुपेश ठमके, कपिल बोबडे, राकेश काकडे आदींनी सहभाग नोंदविला. त्यानंतर केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. 

No comments:

Powered by Blogger.